दाऊद इब्राहिम पुन्हा बॉलीवूडमध्ये सक्रिय

By admin | Published: February 8, 2015 01:54 AM2015-02-08T01:54:37+5:302015-02-08T01:54:37+5:30

दहशतवादी दाऊद इब्राहिमने खंडणी, पायरसीबरोबरच बॉलीवूडमध्येही आपले पाय पुन्हा रोवायला सुरुवात केली असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

Dawood Ibrahim again active in Bollywood | दाऊद इब्राहिम पुन्हा बॉलीवूडमध्ये सक्रिय

दाऊद इब्राहिम पुन्हा बॉलीवूडमध्ये सक्रिय

Next

डिप्पी वांकाणी - मुंबई
दहशतवादी दाऊद इब्राहिमने खंडणी, पायरसीबरोबरच बॉलीवूडमध्येही आपले पाय पुन्हा रोवायला सुरुवात केली असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले. इब्राहिम कासकरच्या अटकेचा त्याच्या या कारवायांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
इस्टेट एजंटकडे ३ लाखांची खंडणी मागितल्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीवरून इब्राहिमला अटक झाली. हा प्रकार मालमत्तेच्या वादामुळे झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भारतात स्थानिक पातळीवर खंडणी वसूल करण्यात सक्रिय असलेल्या दाऊदचा विश्वसनीय साथीदार तारीक परवीन याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र दाऊदवर परिणाम झाला होता, असे या अधिकाऱ्याने सांगितले. दाऊद सुरुवातीपासूनच खंडणी उकळण्याचे मार्ग म्हणून रीअल इस्टेट आणि बॉलीवूडला टार्गेट करीत आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दाऊदचे त्याच्या अखत्यारीतील भागावर योग्य नियंत्रण आहे. पण असे असूनही त्या भागात रवी पुजारीसारख्यांविरोधात तक्रारी आहेत. छोटा शकील हा भारतात दाऊदसाठी काम करीत आहे. त्यामुळे दाऊदवर सध्या तक्रार दाखल झालेली नाही. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम दक्षिण आणि मध्य पूर्व आशियात रीअल इस्टेट आणि ड्रग्जचा कारभार सांभाळत आहे. मात्र दाऊदला मिडल इस्ट एशियात मुक्त प्रवेश मिळत असल्याने तेथे पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेऊन तो व्यवसाय विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. ड्रग्जचा धंदा हा त्याचा भाऊ अनिसच सांभाळतो आणि सध्या दाऊदचे वास्तव्य कराचीतील क्लिफ्टन टाऊन येथे असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Dawood Ibrahim again active in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.