CoronaVirus: Just a day view of the ST corporation; Employee health question | CoronaVirus : एसटी महामंडळाचा फक्त एक दिवसाचा देखावा; कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न

CoronaVirus : एसटी महामंडळाचा फक्त एक दिवसाचा देखावा; कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न

- कुलदीप घायवट

मुंबई : एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानके धुणे, एसटी कर्मचाºयांना मास्क व सॅनिटायझरची बाटली देणे, अशा खबरदारीच्या सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाकडून या सूचनांचे पालन एक दिवसासाठी केले. आता बसही धुतली जात नाही आणि एसटी कर्मचाºयांना मास्कही देत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी एसटी कर्मचाºयांसह अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, अशा सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. त्यानुसार चालक, वाहक, कंट्रोल कॅबिनमधील वाहतूक नियंत्रक व बसस्थानकातील वाहतूक पर्यवेक्षक यांना संसर्गापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने एकच दिवस डिस्पोजल मास्क पुरविण्यात आले. त्यानंतर कर्मचाºयांना मास्क महामंडळाकडून देण्यात आले नाहीत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
एसटी बसची, बसस्थानकांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्याबाबत परब यांनी निर्देश दिले होते. मात्र आगारात कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने बसस्थानकांची स्वच्छता आणि एसटी बसची स्वच्छता होत नसल्याचे दिसून आले.
अत्यावश्यक सेवा देणाºया बृहन्मुंबई महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार, पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरीवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत एसटीच्या बस उपलब्ध केल्या जात आहेत. मात्र हे प्रवासी ज्या बसमधून प्रवास करतात, त्या बसवर कोणत्याही प्रकारची निर्जंतुकीकरण फवारणी केली जात नाही. हात धुण्यासाठी प्रवाशांना सॅनिटायझर उपलब्ध नाही, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. परिणामी, संचारबंदीच्या काळात एसटी कर्मचाºयांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Just a day view of the ST corporation; Employee health question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.