Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 11:03 AM2020-04-16T11:03:34+5:302020-04-16T11:03:49+5:30

मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1896वर पोहचली आहे.  

Coronavirus: coronavirus new patient has decreased by 35% in Mumbai mac | Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट

Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईला थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे समोर आले आहे. मुंबईत बुधवारी 140 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामध्ये गेल्या 11 दिवसांत झालेल्या मृत्यूची ही सर्वात कमी आकडेवारी होती, जिथे आतापर्यंत 114 मृत्यूची नोंद झाली आहे. पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1896वर पोहचली आहे.  

मुंबईत सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. मात्र बुधवारी केवळ दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय महिलेचा आणि  ५० वर्षीय महिलेचा समावेश होता. त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वात कमी प्रकरण

देशातील कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसणा-या महाराष्ट्रातही बुधवारी सुधारणा झाली आणि नवीन प्रकरणांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत घट झाली. बुधवारी महाराष्ट्रात एकूण 232 नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या 6 दिवसांतील हे सर्वात कमी आकडेवारी असून, मंगळवारच्या तुलनेत 34 टक्के कमी आली आहे.

देशात नवीन प्रकरणांमध्ये 25% घट

बुधवारी नवीन प्रकरणं समोर आली असली तरी केवळ 866 नवीन रुग्ण देशात आढळून आले  होते. त्यापूर्वीचा दिवस मंगळवारपेक्षा ही आकडेवारी सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. या आठवड्यात नवीन प्रकरणांची सर्वात कमी संख्यासुद्धा आहे. सोमवारी देशात कोरोना विषाणूचे 1200हून अधिक नवीन रुग्ण आढळले होते. मंगळवारीही सुमारे 1100 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती. जर आजचा हा ट्रेंड कायम राहिला तर भारत लवकरच कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवू शकतो.
 

Web Title: Coronavirus: coronavirus new patient has decreased by 35% in Mumbai mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.