Join us  

Coronavirus : रेल्वेकडून दररोज तब्बल 375 आयसोलेशन कक्ष तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:21 PM

Coronavirus : रेल्वे मंत्रालयाकडून एकुण ५ हजार जुन्या आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात येणार आहे.

मुंबई - कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक स्तरातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे मंत्रालयाकडून एकुण ५ हजार जुन्या आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात येणार आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे २ हजार ५०० डब्यांचे आयसोलेशन कक्षांत रूपांतर झाले आहे. या कामाला गती मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका दिवसाला ३७५ आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेवेच्या प्रयत्नांना पूरक बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून  प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करणे, प्रवासी डब्यांचे विलगीकरण करून आयसोलेशन कक्ष तयार केले जात आहेत. रेल्वेने एकूण २ हजार ५०० डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात झाले आहे. यातून ४० हजार खाटा तयार करण्यात आले आहेत. दिवसाला ३७५ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे काम रेल्वेचे कर्मचारी करीत आहेत.

प्रत्येक कोचमध्ये 10  ते 16  कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहे. यासाठी 20 डब्याचे स्वरूप बदलले जात आहे. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचं रुपांतर बाथरूममध्ये करण्यात आले आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि साबण प्लेट ठेवली आहे. यासह डब्याचा मधला  बर्थ, शिडी काढण्यात येणार आहे. टॉयलेटमध्ये बादली, मग आणि साबण प्लेट ठेवली आहे. यासह डब्याचा मधला बर्थ, शिडी काढण्यात येणार आहे. 

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 892 डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी 482 आयसोलेशन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. परळ वर्कशॉप  एलटीटी आणि वाडीबंदर येथील कोच केअरिंग सेंटरमध्ये देखील आयसोलेशन डबे तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावर 410 डब्याचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये होणार आहे. हे काम लोअर परळ, गुजरातमधील वर्कशॉपमध्ये सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! लॉकडाऊननंतर सोपा नसणार रेल्वेप्रवास

Coronavirus : बापरे! 'या' देशात रस्त्यावरच पडले मृतदेह, 'हे' आहे कारण

Coronavirus : 'आम्हाला पैशांची समस्या नाही तर...', केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यारेल्वेमध्य रेल्वेभारतमृत्यू