Coronavirus:पोलिसांच्या मदतीसाठी राज्याची केंद्राकडे धाव; सीएपीएफच्या २० तुकड्या पाठवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:13 PM2020-05-13T13:13:47+5:302020-05-13T13:16:38+5:30

कोरोना विषाणू पोलिसांच्या शरीरात घुसतोय व त्यांचा बळी घेतोय. हे देशभरातच सुरू आहे

Coronavirus: 20 companies of Central Armed Police Force demand help from the state pnm | Coronavirus:पोलिसांच्या मदतीसाठी राज्याची केंद्राकडे धाव; सीएपीएफच्या २० तुकड्या पाठवण्याची मागणी

Coronavirus:पोलिसांच्या मदतीसाठी राज्याची केंद्राकडे धाव; सीएपीएफच्या २० तुकड्या पाठवण्याची मागणी

Next

मुंबई - राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल  कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची  बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने   केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने गृहखात्याला खोचक सल्ला दिला होता. कोरोना विषाणू पोलिसांच्या शरीरात घुसतोय व त्यांचा बळी घेतोय. हे देशभरातच सुरू आहे. दिल्ली पोलिसांनाही कोरोनाने ग्रासले आहे. दीडशेच्यावर दिल्ली पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत. याशिवाय निमलष्करी दलांतही कोरोना घुसला आहे. आतापर्यंत निमलष्करी दलांच्या हजारावर जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एएसबी दलांचे जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर आपण सगळे आहोत ते पोलीस दल कोरोना विषाणूच्या हल्ल्याने बेचैन झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांविषयी सहानुभूती, संवेदना वगैरे व्यक्त केली. राज्यातील पोलिसांना थोडी विश्रांती देऊन केंद्राकडून अधिकचे मनुष्यबळ महाराष्ट्रात मागवावे असे त्यांचे मत आहे व ते चुकीचे नाही, पण जे केंद्रीय सुरक्षा बल राज्याला हवे आहे त्यातही कोरोनाने घुसून सगळ्यांना हवालदिल करून सोडले आहे असं म्हटलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

२० लाख कोटींमध्ये किती शून्य येतात?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

 

Web Title: Coronavirus: 20 companies of Central Armed Police Force demand help from the state pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.