coronavirus: राज्यात २ लाख ६ हजार ६१९ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 07:26 AM2020-07-06T07:26:47+5:302020-07-06T07:27:11+5:30

सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १ लाख ११ हजार ७४० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

coronavirus: 2 lakh 6 thousand 619 corona patient in the state | coronavirus: राज्यात २ लाख ६ हजार ६१९ कोरोनाबाधित

coronavirus: राज्यात २ लाख ६ हजार ६१९ कोरोनाबाधित

Next

मुंबई : राज्यात रविवारी ६ हजार ५५५ रुग्ण आणि १५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १ लाख ११ हजार ७४० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०८ एवढे झाले असून मृत्यूदर ४.२७ टक्के आहे. राज्यात नोंद झालेल्या १५१ मृत्यूंमध्ये मुंबईत ६९, ठाणे १, ठाणे मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ८,भिवंडी निजामपूर मनपा ३, मीरा भार्इंदर मनपा १, वसई विरार ४, नाशिक २, धुळे ४, जळगाव ६, जळगाव मनपा ४, पुणे ३, पुणे मनपा २०, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर मनपा ४, औरंगाबाद १, औंरगाबाद मनपा १० या रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.५७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ६ लाख ४ हजार ६३ लोक घरगुती अलगीकरणात असून ४६ हजार ६२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

ठाण्यात मुंबईपेक्षा
अधिक सक्रिय रुग्ण
राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र आता ठाण्यात मुंबईपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत सध्या २३ हजार ७३२ रुग्ण सक्रिय आहेत, तर ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५०८ रुग्ण सक्रिय असल्याची नोंद आहे. ठाण्यात ४७ हजार ९३५ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत १८ हजार १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ४३ दिवसांवर

मुंबईत दिवसभरात १ हजार २८७ रुग्ण, तर ६९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगराची एकूण रुग्णसंख्या ८४ हजार ५२४ , तर मृत्यू ४ हजार ८९९ झाले आहेत. आतापर्यंत ५५ हजार ८८४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६९ मृत्यूंपैकी ६१ जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४२ जण पुरुष तर २७ जण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४३ जणांचे वय ६०हून अधिक होते. तर उर्वरित २२ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्के असून गेल्या आठवड्यात कोविड वाढीचा एकूण दर १.६३ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ४३ दिवसांवर गेला असून शहर उपनगरात आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६४९ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत.

Web Title: coronavirus: 2 lakh 6 thousand 619 corona patient in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.