कोरोनाच्या तीन महिन्यांत ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST2021-06-19T04:06:11+5:302021-06-19T04:06:11+5:30

मुंबई : महावितरणने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्च महिन्यात ६६ हजार ३१०, एप्रिलमध्ये एक लाख ४४ हजार ...

Corona's 3.14 lakh new connections in three months | कोरोनाच्या तीन महिन्यांत ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या

कोरोनाच्या तीन महिन्यांत ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या

मुंबई : महावितरणने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्च महिन्यात ६६ हजार ३१०, एप्रिलमध्ये एक लाख ४४ हजार ६५१ व मेमध्ये एक लाख तीन हजार ४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तीन लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. शिवाय तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केद्रांना ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार देण्यात आले.

महावितरणने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख, तर थ्री फेजचे एक लाख ७० हजार नवीन मीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश दिले. आतापर्यंत सिंगल व थ्री फेजचे नऊ लाख ५३ हजार नवीन वीज मीटर उपलब्ध झाले. पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना ते पाठविण्यात आले आहेत, तर सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्याचे कार्यादेश फेब्रुवारीमध्ये दिले. त्यामुळे आतापर्यंत सिंगल फेजचे आठ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून, ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले.

कोणाला किती नवीन वीजजोडण्या (उच्चदाब वर्गवारी)

उद्योग- १७९

वाणिज्यिक- २४

कृषी- ७

इतर - ४०

एकूण - २५०

----------

कोणाला किती नवीन वीजजोडण्या (लघुदाब वर्गवारी)

घरगुती- २ लाख ३३ हजार ४२७

वाणिज्यिक - ३८ हजार २४

औद्योगिक - ६६५०

कृषी - ३१ हजार ४७५

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना - ३८३

इतर - ४ हजार २००

एकूण - ३ लाख १४ हजार १५९

---------------

कोणाला किती नवीन वीज मीटर (कंसात थ्री फेज)

पुणे प्रादेशिक कार्यालय - सिंगल फेज २ लाख ६९ हजार (३०,६०३)

कोकण - सिंगल फेज ३ लाख २४ हजार (२५,७८७)

नागपूर - १ लाख ९३ हजार (१८,३६०)

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे ८२ हजार व थ्री फेजचे १०,२५०

Web Title: Corona's 3.14 lakh new connections in three months