‘दारूमुक्त खारघर’साठी संघर्ष समिती आक्रमक

By Admin | Updated: June 15, 2015 05:53 IST2015-06-15T05:53:24+5:302015-06-15T05:53:24+5:30

खारघर शहरामधील तारांकित हॉंटेल रॉयल ट्युलीपला राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी पदाचा गैरवापर करीत दारूविक्रीचा परवाना दिल्याच्या

Clash Committee for 'Drug Free Kharghar' aggressive | ‘दारूमुक्त खारघर’साठी संघर्ष समिती आक्रमक

‘दारूमुक्त खारघर’साठी संघर्ष समिती आक्रमक

पनवेल : खारघर शहरामधील तारांकित हॉंटेल रॉयल ट्युलीपला राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी पदाचा गैरवापर करीत दारूविक्रीचा परवाना दिल्याच्या निषेधार्थ रविवारी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. निषेधाच्या घोषणा देत खारघर पोलीस ठाण्यात संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी संघर्ष सामाजिक संघटना, राजकीय नेते, सामाजिक, धार्मिक संस्था मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. हा लढा देत असताना शहरामध्ये सुरू झालेले शाम वाइन्स हे दारू विक्रीचे दुकान खारघरवासीयांनी बंद केले होते. मात्र शहरामध्ये दारूविक्र ीला विरोध असून देखील उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई यांनी हॉटेल रॉयल ट्युलीपला दारूविक्र ीचा परवाना दिला. याच्या निषेधार्थ रविवारी संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय मोर्चा शहरात काढण्यात आला. उत्सव चौक याठिकाणाहून या मोर्चाची सुरु वात झाली. या मोर्चाला महिला व विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय होती. खारघर पोलिसांच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते .
यावेळी उपस्थितांमध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय घरत, डॉ. वैभव भदाणे, माजी आमदार विवेक पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, शेकापचे बाळाराम पाटील, खारघर सरपंच वनिता पाटील उपस्थित होते . (प्रतिनिधी)

Web Title: Clash Committee for 'Drug Free Kharghar' aggressive