सीबीआयचे छापे

By Admin | Updated: March 13, 2015 01:19 IST2015-03-13T01:19:19+5:302015-03-13T01:19:19+5:30

प्रशासनातील महत्वाच्या दस्तावेजांच्या विक्री प्रकरणी आज सीबीआयने मुंबई आणि दिल्लीत छापे घातले. यात मुंबईतील चॉर्टन्ट अकाऊटंट आणि दोन सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.

CBI raids | सीबीआयचे छापे

सीबीआयचे छापे

मुंबई : प्रशासनातील महत्वाच्या दस्तावेजांच्या विक्री प्रकरणी आज सीबीआयने मुंबई आणि दिल्लीत छापे घातले. यात मुंबईतील चॉर्टन्ट अकाऊटंट आणि दोन सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत मुंबईत स्थित चार्टट अकाऊंटट खेमचंद गांधी यांच्या घरी छापा घातला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या सूत्रानुसार त्यांच्या घरातून ६0 लाख रूपयांची रोकड आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली. दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे घालण्यात आले असून त्यांच्याकडेही महत्वाचे दस्तावेज आढळून आले. याप्रकरणी खेमचंद गांधी यांची चौकशी सुरू आहे.

Web Title: CBI raids