राज्यसभेसाठी पोटनिवडणूक

By Admin | Updated: March 3, 2015 02:15 IST2015-03-03T02:15:19+5:302015-03-03T02:15:19+5:30

राज्यसभेच्या एका पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून नामनिर्देशन पत्र देण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे.

Bye-elections for the Rajya Sabha | राज्यसभेसाठी पोटनिवडणूक

राज्यसभेसाठी पोटनिवडणूक

मुंबई : राज्यसभेच्या एका पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून नामनिर्देशन पत्र देण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे.
मुरली देवरा यांचे निधन झाल्यामुळे राज्यसभेवर महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवड केली जाणार आहे. या जागेवर शिवसेनेने दावा सांगितला आहे. मात्र भाजपाकडून राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि राम माधव यांच्या नावाची चर्चा आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ११ मार्च रोजी होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Bye-elections for the Rajya Sabha