नांदिवली ग्रा.पं.चे दप्तर जमा

By Admin | Updated: June 19, 2015 00:17 IST2015-06-19T00:17:56+5:302015-06-19T00:17:56+5:30

७ गावांतर्गत नांदिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचाने गुरूवारी दुपारी ग्रा.पं.चे दप्तर अधिकाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने सुपूर्द केले.

Bondage deposit of Nandivali Gram Panchayat | नांदिवली ग्रा.पं.चे दप्तर जमा

नांदिवली ग्रा.पं.चे दप्तर जमा

चिकणघर : २७ गावांतर्गत नांदिवली ग्रामपंचायतीच्या सरपंचाने गुरूवारी दुपारी ग्रा.पं.चे दप्तर अधिकाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने सुपूर्द केले. याआधी सागाव-सागर्ली ग्रामपंचायतीचे दप्तर जमा करण्यात आले होते. २७ पैकी दोन ग्रामपंचायतींचे दप्तर जमा झाले असून अजून २५ ग्रामपंचायतींचे दप्तर जमा व्हायची आहेत. दप्तर जमा करण्यास तयार असलेल्या पाच ग्रा.पं.चे सरपंच शिवसेनेचे आहेत.

दप्तर घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण
-२७ गावांतील भोपर आणि आजदे ग्रामपंचायतीचे दप्तर जमा करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांना मंगळवारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हुसकावून लावले. तर जि.प.च्या अधिकाऱ्यांना जबर मारहाण केली. दुपारी दीड-दोन वाजण्याच्या सुमारास कडोंमपाचे अधिकारी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेण्यासाठी येणार असल्याची आगाऊ खबर संघर्ष समितीला मिळाली होती.
-ग्रामस्थांसह समितीचे पदाधिकारी आधीच ग्रा.प.च्या कार्यालयाबाहेर जमले होते. मनपा अधिकारी येताच त्यांना घेराव घालून पिटाळून लावण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्यासह सर्व पदाधिकारी घटनास्थळी होते. दरम्यान, जि.प.चे दोन अधिकारीही अडीच वाजण्याच्या सुमारास गोळवली ग्रामपंचायत हद्दीत सर्व्हे करीत असता ग्रामस्थांनी त्यांना जबर मारहाण केली.

Web Title: Bondage deposit of Nandivali Gram Panchayat