Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 18:30 IST

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश राणे टोला लगावला आहे.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचे सांगितले. मात्र उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश राणे टोला लगावला आहे.

पहिले पुढचा शिवसेनेचा मुंबईचा महापौर बसवा, पतंप्रधान तर लांबच राहिले, असं ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याच्या निर्धारानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. 

India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया

तत्पूर्वी, शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. 'प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

"एवढी वर्ष काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही"

उद्धव ठाकरे या बैठकीत पुढे म्हणाले की, मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे.मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही. त्याचप्रमाणे भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार वर्धापन दिनी केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनीतेश राणे शिवसेनाभाजपासंजय राऊतमहाराष्ट्र सरकारमुंबई महानगरपालिका