उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:38 PM2022-04-18T14:38:44+5:302022-04-18T14:39:08+5:30

चौकशीआधी किरीट सोमय्यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला.

BJP leader Kirit Somaiya has criticized the Mahavikas Aghadi government and CM Uddhav Thackeray. | उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या

Next

मुंबई- आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. विक्रांत घोटाळ्याबाबत सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी किरीट सोमय्या आज हजर राहिले होते. 

चौकशीआधी किरीट सोमय्यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर आतापर्यंत साडे सात हजार कोटी, ईडी सोबत पार्टनरशिप, जुहूच्या १०० कोटीचा प्लॉट, वसई पालघरमध्ये वाधवान सोबत ४२६ कोटी रुपयांचा आरोप, असे जवळपास एक डझन माझ्यावर आरोप लावलेत.  एसआयटी स्थापन केल्या, मात्र खोदा पहाड निकला चूहा अशी स्थिती आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या म्हणाले की, मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे. राहिली गोष्ट आजची तर मला न्यायव्यवस्थेने सांगितले पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करा.  मी न्यायदेवतेचा सन्मान करतो. ठाकरे सरकार सारखा अपमान करत नाही. आज दुपारी एक वाजता आझाद मैदान कोर्टामध्ये कोरोना हॉस्पिटल घोटाळा संदर्भात मी याचिका केली आहे, त्यावर आज सुनावणी आहे. ठाकरे सरकार त्या सुनावणीमध्ये हजर राहण्यास मुभा देता का हे पाहू, असं ते म्हणाले. 

दरम्यान, आयएनएस विक्रांत बचाव घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी कोर्टाने फेटाळला. त्यामुळे त्यांच्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी बुधवारी बोलवण्यात आले होते. किरीट सोमय्या जर आज चौकशीसाठी हजर राहिले नाही, तर त्यांना फरार घोषित करण्यात येईल, असा इशाराही गुन्हे शाखेने दिला होता.

शिवसेनानेते संजय राऊतांचे गंभीर आरोप-

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात समन्स बजावूनही चौकशीला हजर न झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. आयएनस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात आले. हे प्रकरण लहान नाही. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जाऊ शकतात, अशी भीतीही संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.
 

Web Title: BJP leader Kirit Somaiya has criticized the Mahavikas Aghadi government and CM Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.