‘पॉर्न स्टार, सेक्स स्कँडल’वरून उद्धवसेना-भाजपमध्ये संघर्ष; उद्धवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:34 AM2024-05-03T08:34:29+5:302024-05-03T08:37:46+5:30

भाजपचा आरोप; भाजपने रेवण्णावर बोलावे : उद्धवसेनेचे आव्हान

bjp leader Chitra Wagh alleged that the Thackeray group used the porn star to make an advertisement for election campaign | ‘पॉर्न स्टार, सेक्स स्कँडल’वरून उद्धवसेना-भाजपमध्ये संघर्ष; उद्धवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टार

‘पॉर्न स्टार, सेक्स स्कँडल’वरून उद्धवसेना-भाजपमध्ये संघर्ष; उद्धवसेनेच्या जाहिरातीत पॉर्न स्टार

मुंबई : निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धवसेनेने पॉर्न स्टारला घेऊन जाहिरात बनविल्याचा आरोप भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. उद्धवसेनेची निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच, जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठविणारा पॉर्न स्टार आणि उद्धवसेना यांचा संबंध काय आहे, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण ३ हजारांहून जास्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या एचडी व्हिडीओवाल्याबद्दल त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या.

- सुषमा अंधारे, उपनेत्या उद्धवसेना

भाजपने लोकसभा निवडणुकीत एका पॉर्न स्टारला उमेदवारी दिली आहे. या पॉर्न स्टारने हजारो महिलांचे शोषण केले आहे. याविषयी जाब का विचारत नाही?

- खा. प्रियंका चतुर्वेदी, उद्धवसेना

भाजपने आता प्रज्वल रेवण्णावर बोलावे. भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्याने येऊन त्याचा प्रचार केला. असा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपमधून त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही.

- आमदार आदित्य ठाकरे, नेते, उद्धवसेना

‘ही महिलांची क्रूर चेष्टा नाही का?’

लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उद्धवसेनेने बनवलेल्या जाहिरातींमधून एक पॉर्न स्टारच जनतेला महिलांवरील अत्याचार कधी थांबणार, असा सवाल विचारत आहे. ही जाहिरात पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेने खाली झुकली गेली.

उद्धवसेनेने अश्लील ॲप वरून लहान मुलींबरोबर अश्लील चित्रीकरण करणाऱ्या पॉर्नस्टारच्या माध्यमातून प्रचार चालवला आहे. हा पॉर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो, यासारखी महिलांची क्रूर चेष्टा नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: bjp leader Chitra Wagh alleged that the Thackeray group used the porn star to make an advertisement for election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.