भोजपुरी गायिकेबाबत अश्लील कमेंट करणाऱ्याला अटक

By Admin | Updated: March 3, 2015 01:36 IST2015-03-03T01:36:09+5:302015-03-03T01:36:09+5:30

एका भोजपुरी गायिकेबाबत सोशल साइटवर अश्लील कमेंट करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला आज कुरार पोलिसांनी नालासोपाऱ्यातील त्याच्या घरून अटक केली.

Bhojpuri porn star arrested | भोजपुरी गायिकेबाबत अश्लील कमेंट करणाऱ्याला अटक

भोजपुरी गायिकेबाबत अश्लील कमेंट करणाऱ्याला अटक

मुंबई : एका भोजपुरी गायिकेबाबत सोशल साइटवर अश्लील कमेंट करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला आज कुरार पोलिसांनी नालासोपाऱ्यातील त्याच्या घरून अटक केली. अटक करण्यात आलेला तरुणदेखील गायक असून, सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
संदीप सलोना असे अटक करण्यात आलेल्या गायक तरुणाचे नाव आहे. यातील तक्रारदार महिला मालाड पूर्व परिसरात राहते. अनेक स्टेज शोमध्ये सलोनासह या गायिकेने काम केले आहे. सलोना माझे अश्लील फोटो आणि माझ्याबाबत अश्लील कमेंट रात्री सोशल नेटवर्किंग साइटवर टाकतो आणि सकाळी ते काढून टाकतो. या कमेंट्स अनेक लोकांनी वाचून मला सांगितले. सलोनामुळे आपली बदनामी झाल्याची तक्र ार या गायिकेने कुरार पोलीस ठाण्यात शनिवारी केली होती. त्यानुसार पोलिसांनी आज सलोनाला त्याच्या घरातून उचलले. सलोनाचा नालासोपाऱ्यातील पत्तादेखील याच गायिकेने पोलिसांना दिला होता. संबंधित गायिकेची बदनामी होईल, अशा प्रकारचे मी काहीच लिहिले नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Bhojpuri porn star arrested