बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:44 IST2025-08-20T15:39:44+5:302025-08-20T15:44:38+5:30

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आले. महापालिका हातात असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बेस्टसाठी काही केले नाही, अशी टीका शशांक राव यांनी केली.

best election 2025 after panel big win shashank rao told inside story about how the cm devendra fadnavis valuable help and thackeray brother badly defeated | बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story

बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्टमध्ये जो खासगीकरणाचा डाव आहे, तो या निकालाने उधळला गेला. सध्या बेस्टची जी वाईट स्थिती आहे, त्याला शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही जबाबदार आहे. उद्धवसेना गेल्या अनेक वर्षांपासून या समितीत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेस्टचे नुकसान केले. ९ वर्षांनी ही निवडणूक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी न्याय लढा देत आहोत. हा निवडणुकीचा निकाल हे त्याला आलेले यश आहे, असे प्रतिपादन शशांक राव यांनी केले. 

ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर

मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे बेस्टची निवडणूक अधिक चर्चेत होती. निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शशांक राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली मदत, ठाकरेंचा झालेला पराभव तसेच या निवडणुकीबाबत अनेक मुद्द्यांवर शशांक राव यांनी सविस्तर भाष्य केले.

मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?

कामगारांसाठी कामे केली नाही आणि कितीही एकत्र आले तरी भोपळे मिळणारच

या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणे हा काही मुद्दा नव्हता. कामगारांसाठी जो लढा देईल, हक्कासाठी लढेल, मग तो एकटा असला तरी त्याला निवडून दिले जाते, हे या निकालाने दाखवून दिलेले आहे. कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांसाठी जर काम केले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार, असा खोचक टोलाही शशांक राव यांनी लगावला. तसेच गेल्या ३ वर्षांपासून कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम मिळाली नाही. त्याविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. त्याची ही पोचपावती आहे, असे शशांक राव यांनी नमूद केले.

बेस्ट निवडणूक निकाल २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आले

आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही. १९४६ पासून आमची संघटना आहे. यामध्ये अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस या संघटनेचे अध्यक्ष होते, शरद राव या संघटनेचे सरचिटणीस होते. आमची संघटना कामगारांसाठी काम करते. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई महापालिका होती. ते मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले नाहीत. मी भाजपामध्ये असल्याने त्या पक्षाचा विचार मानतो. कामगार संघटनांचा हेतू एकच असतो, ते कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कामगारांसाठी आम्हाला नेहमीच मदत केली आहे. त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आले, असे शशांक राव यांनी सांगितले.

ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

ही लिटमस टेस्टकडे ठाकरे बंधूंनी गांभीर्याने घेतली नाही

ही लिटमस टेस्टकडे ठाकरे बंधूंनी गांभीर्याने घेतली नाही. कामगार विश्वासात ठाकरे बंधूंनी विश्वासहर्यता गमावल्याचा संदेश पोहोचवण्यात महायुतीला यश आले हे नाकारून चालणार नाही. आपले पॅनल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उशीरा उतरले. मतांचे विभाजन करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ही या निमित्ताने निकाली निघाले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचे म्हणतात. पण ते ९ वर्षे बेस्ट पतपेढीत होते. याशिवाय, २५ वर्षे बेस्ट समितीत होते. सुहास सामंत या कमिटीत होते तेव्हा कामगारांच्या ग्रॅच्युईटीचा पैसा ज्याला हात लावायचा नसतो, ते पैसाही ठेकेदारांना वाटण्यात आला. त्यामुळे सुहास सामंत यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असा पलटवार शशांक राव यांनी केला.

बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी २०१७ मध्ये बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन पाळले नाही. बेस्टच्या स्वमालकीच्या २५० बस शिल्लक होत्या. आम्ही २०१९ मध्ये एमओयू केला होता. बेस्टने स्वमालकीच्या ३३३७ बस राखल्या पाहिजे. शिवसेनेकडे कमिटी आणि महानगरपालिका असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही बेस्टसाठी एकही बस विकत घेण्यात आली नाही, असा मोठा दावा शशांक राव यांनी केला.

 

Web Title: best election 2025 after panel big win shashank rao told inside story about how the cm devendra fadnavis valuable help and thackeray brother badly defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.