महापुरुषांच्या योगदानाची जाण ठेवा

By Admin | Updated: August 2, 2014 02:08 IST2014-08-02T02:08:50+5:302014-08-02T02:08:50+5:30

मुंबई आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले त्यांच्या योगदानाची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले.

Be aware of the contribution of great men | महापुरुषांच्या योगदानाची जाण ठेवा

महापुरुषांच्या योगदानाची जाण ठेवा

मालाड : मुंबई आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले त्यांच्या योगदानाची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले.
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आज मालाड येथे लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे अनावरण महापौरांच्या हस्ते करण्यात आले. मालाड पश्चिम येथील झकेरीया मार्गावरील चौकाला लोकमान्य टिळक यांचे नाव देण्यात आले होते. मात्र तेथील वास्तूची दुरवस्था झाली होती. यासाठीच लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून नगरसेविका अनघा म्हात्रे यांच्या पुढाकाराने लोकमान्यांची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.या वेळी नगरसेविका अनघा म्हात्रे, विनोद घोसाळकर, महापालिका
पी/ उत्तर विभागाचे सहआयुक्त देवेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विद्या प्रबोधन विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्यापाटप करण्यात आले. तसेच महापौर प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)

Web Title: Be aware of the contribution of great men