अनिल पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:49 AM2020-08-10T02:49:41+5:302020-08-10T02:49:45+5:30

मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली

Anil Patil passed away due to long illness | अनिल पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

अनिल पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर, वेदिक्यूअरचे संस्थापक-संचालक आणि संयुक्त उपचार पद्धतीचे जनक डॉ. अनिल पाटील यांचे शनिवारी रात्री निधन झाले. गेला महिनाभर ते आजारी होते. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. विक्रोळी येथे स्मशानभूमीत रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

डॉ. पाटील यांचे दादरमध्ये संयुक्त उपचार पद्धती क्लिनिक होते. मागील महिनाभरापासून ते आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. हा आजार बळावला, त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आणि त्यातच शनिवारी रात्री त्यांनी जुहू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती वेदिक्यूअरच्या प्रवक्त्याने दिली.  

Web Title: Anil Patil passed away due to long illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.