रेल्वे रुळांची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, साबण वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:34 PM2020-04-11T20:34:46+5:302020-04-11T20:35:25+5:30

रुळांची दुरुस्ती करणे, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करणे सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, साबण, हातमोजे देण्यात येत आहेत.

Allotment of masks, soap to the railway repairing staff | रेल्वे रुळांची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, साबण वाटप

रेल्वे रुळांची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, साबण वाटप

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर अत्यावश्यक सेवेतील रेल्वेचे कर्मचारी काम करत आहेत. रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी रुळांची दुरुस्ती करणे, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करणे सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, साबण, हातमोजे देण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क, हातमोजे वापरणे जात आहेत. उन्हापासून सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सामाजिक अंतर आणि सुरक्षित कामासाठी सहायक विभागीय अभियंत्याद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांना समुपदेशन करीत आहेत. प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला देखभालीसाठी  मास्क, सेनिटायझर्स, साबण आणि हातमोजे वाटप करत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागातील प्रत्येक अभियांत्रिकी अधिकारी रेल्वे कर्मचाऱ्यांची देखभाल घेत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेच्या ट्रॅकमन (महिला) ड्युटीवरील आपल्या सहकारी आणि  रेल्वे कर्मचा-यांसाठी मास्क तयार करत आहेत. महिला ट्रॅकमन कल्पना नेवरे, मोनिका वाघमारे, रंजना क्षीरसागर यांनी प्रत्येकी १५० मास्क तयार केले आहेत. यासह आणखी १५० मास्क तयार करत आहेत. महिला ट्रॅकमन त्यांच्या घरी स्वतःच्या इच्छेने काम करत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा होत आहे.
------------------------------------------------

कोरोनामुळे विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद केली आहे. मात्र मालगाडीची वाहतुक सेवा सुरु आहे. याकाळात मध्य रेल्वेचे बरेच कर्मचारी या कठीण काळात काम करत आहेत. लॉक-डाऊन दरम्यान गाड्यांची मालवाहतूक चालविण्यासाठी सुरक्षित ट्रॅक राखण्यासाठी विविध ठिकाणी ट्रॅक मेंटेनर महत्वाची भूमिका बजावत आहेत.  या लॉक-डाउनच्या  परिस्थितीत आपल्या देशाच्या विविध भागात आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालवाहतूक आणि पार्सल वाहतुकीची सुरळीत वाहतूक करते.  माल वाहतुकीसाठी ट्रॅक देखभालकर्ता (मेंटेनर) ट्रॅक सुरक्षित ठेवत आहेत.  जेव्हा राष्ट्र कठीण काळातून जात आहे आणि कोरोना विरूद्ध लढा देत आहे. तेव्हा ट्रॅक देखभाल करणार्‍यांना याचे महत्त्व समजले आहे.  या कठीण परिस्थितीत ट्रॅक देखभाल करणारे आवेशाने आपले कर्तव्य बजावत आहेत,  अशी  माहिती  मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दिली.

Web Title: Allotment of masks, soap to the railway repairing staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.