वराचे वय ५८, तर वधू २० वर्षांची !

By Admin | Updated: January 3, 2015 01:25 IST2015-01-03T01:25:58+5:302015-01-03T01:25:58+5:30

प्रेम करायला वयाचे बंधन नसते याची प्रचिती ठाणेकरांना आली. पेशाने पत्रकार असलेले सतीश आपटे यांनी वयाच्या ५८व्या वर्षी २०वर्षीय तरुणीशी विवाह करून नवी इनिंग सुरू केली आहे.

The age of the boy is 58, the bride is 20 years old! | वराचे वय ५८, तर वधू २० वर्षांची !

वराचे वय ५८, तर वधू २० वर्षांची !

ठाणे : प्रेम करायला वयाचे बंधन नसते याची प्रचिती ठाणेकरांना आली. पेशाने पत्रकार असलेले सतीश आपटे यांनी वयाच्या ५८व्या वर्षी २०वर्षीय तरुणीशी विवाह करून नवी इनिंग सुरू केली आहे.
वर्षाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त त्याने विवाहासाठी शोधला. ठाण्यातील विष्णूनगर भागात सध्या ते वास्तव्यास आहेत. आपटे यांचे कुमार कपाडिया यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे कपाडिया यांची मुलगी लिसा हिच्याशीही त्यांची मैत्री झाली. ती लहान असतानाच त्यांनी तिच्या कुटुंबीयांकडे विवाहाची परवानगी मागितली. लिसाच्या घरच्यांनी होकार दिला. परंतु ती १८ वर्षांची होऊ द्या, त्यानंतर विवाह करा, असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे सर्वांच्या संमतीने विवाह केला. (प्रतिनिधी)

Web Title: The age of the boy is 58, the bride is 20 years old!