कुर्ला येथे अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची केली हत्या; फरार आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:24 IST2026-03-19T13:24:23+5:302026-03-19T13:24:38+5:30

रिक्षा चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला असल्याचे सांगितले आहे.

A minor boy killed a rickshaw driver in Kurla; The absconding accused was taken into custody by Nehru Nagar police | कुर्ला येथे अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची केली हत्या; फरार आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

कुर्ला येथे अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची केली हत्या; फरार आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : रिक्षात बसू दिले नाही, ह्याच रागातून वाद घालत एका अल्पवयीन मुलाने रिक्षा चालकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. कुर्ला पूर्वेतील साबळे नगर, न्यू रेल्वे कॉलनी रस्त्यावर सोमवार, १६ मार्च रोजी रात्री ही घटना घडली. जयराज जयपाल नायडू (४८) असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीच्या  नेहरूनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, हत्येचा गुन्हा नोंदवत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. 

जोशुवा जयराज नायडू (२१) यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे वडील जयराज नायडू यांनी अल्पवयीन मुलाला रिक्षामध्ये बसण्यास मज्जाव केला, याच रागातून त्या मुलाने जयराज यांच्या मानेवर डाव्या बाजूला वार केला.  यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी जयराज यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रिक्षा चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास केला असल्याचे सांगितले आहे.

Web Title : कुर्ला में नाबालिग ने ऑटो चालक की हत्या की; आरोपी गिरफ्तार

Web Summary : कुर्ला में एक नाबालिग ने ऑटो चालक को सवारी के लिए मना करने पर चाकू मारकर हत्या कर दी। नेहरू नगर पुलिस ने भाग रहे आरोपी को गिरफ्तार कर लिया। पीड़ित जयराज नायडू पर नाबालिग को प्रवेश से वंचित करने के बाद हमला किया गया। बाद में अस्पताल में उसकी मौत हो गई। पुलिस ने हत्या का मामला दर्ज किया है।

Web Title : Minor Kills Auto Driver in Kurla; Accused Arrested

Web Summary : In Kurla, a minor fatally stabbed an auto driver who refused him a ride. The Nehru Nagar police arrested the fleeing suspect. The victim, Jayraj Naidu, was attacked after denying the minor entry. He later died in hospital. Police have registered a murder case.