देशातील पहिल्या विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ५ शिक्षकांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:57 AM2020-09-20T01:57:04+5:302020-09-20T01:57:14+5:30

अभियंता दिनाच्या निमित्ताने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून सन्मान

5 teachers from Maharashtra compete in the country's first World Best Teacher Award | देशातील पहिल्या विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ५ शिक्षकांची बाजी

देशातील पहिल्या विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ५ शिक्षकांची बाजी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभियंता दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या देशातील पहिल्या एआयसीटीई-विश्वेश्वरय्या या देशातील पहिल्या विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ५ शिक्षकांनी बाजी मारली आहे. विकासाबाबतचे योगदान आणि सामाजिक समस्यांचे निराकरण यांसारख्या निकषांच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या १२ प्राध्यापकांपैकी ५ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील, संस्थांमधील आहेत.
महाराष्ट्रातील ५ पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये एसव्हीईआरआय कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील डॉ. प्रशांत पवार, जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या डॉ. शैलजा पाटील, श्री. गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे डॉ. मनेश कोकरे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे डॉ. श्रीपाद भातलवंडे आणि वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. फारुख अहमद काझी यांचा समावेश आहे. गुरुग्रामच्या नॉर्थ कॅप विद्यापीठाचे मुख्य मार्गदर्शक प्रोफेसर आॅफ एमिनन्स, प्र-कुलगुरू प्रोफेसर प्रेमव्रत यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या एका समितीने निवडीसाठी आलेल्या प्रस्तावांपैकी छाननी केली आणि निवडलेल्या २६१ प्रस्तावांमधून १२ जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या बाराही जणांचा सन्मान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आॅनलाइन संवाद साधून केला. यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष प्रोफेसर एमपी पुनिया आणि एआयसीटीईचे सदस्य सचिव प्रोफेसर राजीव कुमार यावेळी उपस्थित होते.
प्रभावी योगदान देण्यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

नाव - संस्था - विभाग
१) डॉ. प्रशांत पवार- एसव्हीईआरआय कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, पंढरपूर-सिव्हिल इंजिनीअरिंग
२) डॉ. शैलजा पाटील- जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स
३) डॉ. मनेश कोकरे- गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
४) डॉ. श्रीपाद भातलवंडे- विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी- इलेकट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
५) डॉ.फारुख अहमद काझी- वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग

Web Title: 5 teachers from Maharashtra compete in the country's first World Best Teacher Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.