राज्यात ४५,०७१ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:23+5:302021-02-05T04:25:23+5:30

मुंबई : राज्यात दिवसभरात १,६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १९ लाख २९ हजार ५ रुग्णांनी ...

45,071 active patients in the state | राज्यात ४५,०७१ सक्रिय रुग्ण

राज्यात ४५,०७१ सक्रिय रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात १,६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १९ लाख २९ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के झाले आहे. तर सध्या राज्यात ४५ हजार ७१ इतके सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात २ हजार ५८५ रुग्ण आणि ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९ झाली असून बळींचा ५१ हजार ८२ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.८६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार २९४ व्यक्त संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Web Title: 45,071 active patients in the state