१४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:55 PM2023-10-13T13:55:50+5:302023-10-13T13:55:50+5:30

मुलगी दडपणाखाली असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले आणि तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता या गुन्ह्याला वाचा फुटली. 

14-year-old girl molested by family friend | १४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

१४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

मुंबई : १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या फॅमिली फ्रेंडला काळाचाैकी पाेलिसांनी अटक केली. वारंवार होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने पालकांना सांगितले. पण त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, मुलगी दडपणाखाली असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले आणि तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता या गुन्ह्याला वाचा फुटली. 

भायखळा परिसरात १४ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत राहते. फॅमिली फ्रेंड म्हणून असलेला प्रसाद मोरे (२९) याचे नेहमी घरी येणे जाणे असायचे. १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान तो वेळोवेळी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन करत होता. मुलीने याबाबत घरच्यांना वेळोवेळी सांगितले. मात्र, कोणीही तिचे ऐकून घेत नव्हते.

जवळच्या व्यक्तीकडून सर्वाधिक अत्याचार
मुंबई पोलिसांच्या २०२१ च्या अहवालात २९९ अल्पवयीन मुलींसह २७१ तरुणींचा आरोपींच्या जाळ्यात अडकल्या. त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. २३ महिलांवर वडील, भाऊ तसेच मुलांकडून लैंगिक अत्याचाराच्या नात्याला काळीमा फासण्याचा घटना घडल्या आहेत. 

Web Title: 14-year-old girl molested by family friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.