Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kapil Sharma Net Worth: कपिल शर्मा आहे 300 कोटी संपत्तीचा मालक? कॉमेडियनने असं केलं रिअ‍ॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:29 IST

एक मुलाखतीत कपिलला शर्माला विचारण्यात आलं तुझ्याकडे 300 कोटींची संपत्ती आहे का?, यावर उत्तर देताना कपिल म्हणाला...

कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याचा आगामी सिनेमा 'झ्विगॅटो' (Zwigato)च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा १७ मार्चला रिलीज होणार आहे. नंदिता दासने हा सिनेमा तयार केला आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कपिलने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. यादरम्यान कपिल शर्माने आपल्या नेटवर्थबाबत पण तो बोलला.    

किती आहे कपिलचं नेटवर्थ?Aaj Tak ला दिलेल्या मुलाखतीत कपिलला जेव्हा विचारण्यात आले की तुझी संपत्ती 300 कोटी आहे का? यावर उत्तर देताना कपिल हसायला लागला. तो म्हणाला, 'माझे खूप पैसे बुडाले देखील आहेत... खरं सांगायचे तर मी या सर्व गोष्टींचा विचार करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की माझ्याकडे घर आहे, कार आहे, कुटुंब आहे आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

'हो, पण मी साधू नाही आहे. पैसे आल्यावर मी नकार देणार नाही. माझ्या पत्नीला गोष्टींवर खर्च करायला आवडतो, पण मला नाही. पण ती श्रीमंत घरातून आली आहे. त्यामुळे तिचं वेगळे आहे.

कपिलकडे लग्जरी मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1.19 कोटी रुपये आहे. - मर्सिडीजव्यतिरिक्त त्याच्याकडे Volvo XC सुद्धा आहे. त्याच्या कारची किंमत 90 ते 1.3 कोटींच्या जवळ जवळ आहे. - पंजाबमध्ये कपिल शर्माकडे एक प्रशस्त बंगला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा आहेत. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे.

कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. संघर्षाच्या दिवसांत तो पीसीओवर काम करायचा. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला पण संघर्ष सुरुच होता. 2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यानंतर कपिलने अनेक शो केले अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण संघर्षाच्या काळात कधीच हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले.

  

टॅग्स :कपिल शर्मा