‘झिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. होय, ‘झिरो’मधील अनुष्काच्या डायलॉग्सवर पुन्हा एकदा फनी मीम्सचा पूर आला आहे. तूर्तास हे मीम्स वेगाने व्हायरल होत आहेत. ‘झिरो’च्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे, यात अनुष्का शाहरूखला ‘गंवार पसंद है मुझे ’ असे म्हणताना दिसते. हा सीन आणि अनुष्काचा हा डायलॉग ऐकायची देर की, इंटरनेटवरील क्रिएटीव्ह लोकांनी मीम्सचा धडाका सुरू केला. यापूर्वी ‘सुई धागा’ या चित्रपटातील अनुष्काच्या एका फोटोवरही असे शेकडो मीम्स तयार केले गेले होते. या मीम्सनी इंटरनेटवर धूम केली होती.‘झिरो’च्या ट्रेलरमधील अनुष्काचा डायलॉगवरून तयार करण्यात आलेल्या मीम्समध्ये विराट कोहली यालाही लक्ष्य करण्यात आले आहे. ट्रेलरमधील एका फोटोवर अनुष्काचा ‘गंवार पसंद है मुझे ’ हा डायलॉग लिहिला आहे आणि खाली विराटचा फोटो आहे. हे एकापेक्षा एक मजेदार मीम्स पाहून तुम्ही खळखळून हसल्याशिवाय राहणार नाही...तेव्हा पाहा तर...
‘झिरो’चा ट्रेलर अन् अनुष्का शर्मावरचे मीम्स...सोशल मीडिया झाला क्रेजी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 11:01 IST