Join us
Daily Top 2Weekly Top 5

 लयभारी! शाहरूख खानच्या ‘झिरो’ची पोस्टर्स पाहून नेटकरी खुश्श!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 11:15 IST

गतरात्री शाहरूखने ‘झिरो’ची दोन पोस्टर्स रिलीज केलीत. यापैकी एका पोस्टरमध्ये शाहरूख कॅटरिना कैफसोबत दिसतोय आणि दुस-या पोस्टरमध्ये तो अनुष्का शर्मासोबत आहे.

शाहरूख खान उद्या २ नोव्हेंबरला आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक खास भेट देणार आहे.  ही भेट म्हणजे, ‘झिरो’चा ट्रेलर. होय,उद्या खास शाहरूखच्या वाढदिवसाला ‘झिरो’चा ट्रेलर प्रदर्शित होतोय. त्यापूर्वी गतरात्री शाहरूखने ‘झिरो’ची दोन पोस्टर्स रिलीज केलीत.  यापैकी एका पोस्टरमध्ये शाहरूख कॅटरिना कैफसोबत दिसतोय आणि दुस-या पोस्टरमध्ये तो अनुष्का शर्मासोबत आहे. ‘झिरो’च्या या दोन पोस्टर्सनी  शाहरूखच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. सोशल मीडियावर सध्या या दोन पोस्टर्सचीच चर्चा आहे. केवळ शाहरूखचं नाही तर अनुष्का, कॅटरिना यांचे चाहतेही हे पोस्टर्स पाहून भावूक झालेले दिसत आहे. अनेक चाहत्यांनी शाहरूखला बऊआ सिंहच्याच भाषेत मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी दिलेल्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया तुम्ही खाली पाहू शकता.

या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.  यापूवीर्ही अनेक चित्रपटात याच तंत्राचा वापर करून लहानाला मोठे आणि मोठ्याला लहान दाखवण्यात आले आहे. ‘जानेमन’मध्ये अनुपम खेर आणि ‘अप्पू राजा’मध्ये कमल हासन यांनीही बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. याशिवाय हॉलिवूडमध्येही हे तंत्र वापरले गेले आहे. हे तंत्र कुठले, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे तंत्र आहे फोर्स्ड परस्पेक्टिव. फोर्स्ड परस्पेक्टिव   या तंत्रात आॅप्टिकल इल्यूजनच्या मदतीने आॅबजेक्टला लहान, मोठे, दूर वा जवळ दाखवले जावू शकते. या तंत्राद्वारे शाहरूखलाही त्याच्या जवळपासच्या लोकांपेक्षा व वस्तूंपेक्षा लहान दाखवले गेलेय. चित्रपटात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत.  ‘झिरो’त  अनुष्का शर्मा एका यशस्वी महिला शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. तर कॅटरिना कैफ एका व्यसनी हिरोईनची भूमिका साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  श्रीदेवींनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअथार्ने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.  

टॅग्स :झिरो सिनेमाशाहरुख खान