आपल्या सहज-सुंदर आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आता नव्या रूपात अवतरला आहे. ZEE5 चॅनलवर भाऊची एक नवी कोरी वेबसीरिज सुरू झालीय. तिचं नाव आहे, 'लिफ्टमॅन'. अर्थातच त्यातला 'लिफ्टमॅन' आहे आपला भाऊ.
एखाद्या ऑफिस बिल्डिंगचा लिफ्टमॅन प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. रोजच होणाऱ्या भेटीमुळे त्यांच्यात एक नातं, जिव्हाळाही निर्माण झालेला असतो. त्यात, भाऊसारखा लिफ्टमॅन असेल तर विचारूच नका! तो आपल्या भन्नाट 'कल्लाकारी'नं मालिकेला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाताना दिसतोय. भाडिपाच्या अनेक वेबसीरिजमधून दिसलेली पॉला भाऊ कदमसोबत या वेबसीरिजमध्ये आहे. ही देशी-विदेशी केमिस्ट्रीही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
लिफ्टमॅन ही मालिका पाहण्यासाठी आपल्याला अवघ्या ९९ रुपयांत ZEE5 चे सब्सक्रिप्शन घेता येईल. या सब्सक्रिप्शनमध्ये आपण जॉन अब्राहमचा 'परमाणु' आणि 'वीरे दी वेडिंग' हे दोन सिनेमेही पाहू शकणार आहोत. करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तल्सानिया या चौघींचा वीरे दी वेडिंग बॉक्स ऑफिसवर 'हिट' ठरला होता आणि त्यातील स्वराच्या या दृश्यावरून बरीच चर्चाही झाली होती.