Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणा दंग झाला मंजुळाबाईच्या लावणीत? वाचा अंजलीला असे का वाटतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:05 IST

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देराणा मंजुळाच्या लावणीत दंग झाला असल्याचे अंजली स्वप्न पाहाते. या स्वप्नानंतर राणावर अंजली संशय घ्यायला लागते. त्यावरून राणा अंजलीची चेष्टा करतो. दोन वर्षांत राणा वाईट मार्गाला गेला आहे असे अंजलीला वाटते. पण राणा तिची समजूत काढतो.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका असून या मालिकेतील अंजली, राणा, नंदिनी या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत राणाची रिएंट्री झाल्यापासून ही मालिका प्रेक्षकांना प्रंच आवडत आहे. या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात काय झाले आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

मंजुळाबाईने साहेबांचा गावाच्या बाबातीत काय प्लान आहे हे त्यांच्याकडून वदवून घेतले. त्यांना गाव ताब्यात घेऊन तिथे एक फॅक्टरी सुरू करायची असल्याचा त्यांचा डाव असल्याचे बाहेर उभे असलेल्या गावकरी ऐकतात. गावकरी चिडले आहेत हे पाहिल्यावर पप्या तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. पण गावकरी त्यांना दोघांना चांगलाच चोप देतात. 

गावाची मदत केल्यामुळे राणा मंजुळाबाईचे आभार मानतो तर उलट मंजुळाबाई राणाचेच कौतुक करते. तर घरी अंजली झोपेत एक वाईट स्वप्न पाहाते. राणा मंजुळाच्या लावणीत दंग झाला असल्याचे अंजली स्वप्न पाहाते. या स्वप्नानंतर राणावर अंजली संशय घ्यायला लागते. त्यावरून राणा अंजलीची चेष्टा करतो. दोन वर्षांत राणा वाईट मार्गाला गेला आहे असे अंजलीला वाटते. पण राणा तिची समजूत काढतो.

साहेब आता फॅक्टरी टाकणार याच्या आनंदात नंदिनी असते. पण राणा तिला येऊन डाव उधळल्याचे सांगतो. तो नंदिनीला प्रत्येक गोष्ट उलट करून सांगतो. तो सांगतो की, पप्याने दारूच्या नशेत डाव उधळला. हे ऐकून नंदिनी भडकते आणि पप्याला वाड्यावर बोलवते. पण तो घाबरला असल्याने तो काही येणार नाही असे तिला वाटते. त्यामुळे त्याला तू उचलून घेऊन ये असे राणाला सांगते आणि त्याला मारण्यासाठी चाबूक तयार ठेवते. पप्या घाबरून घरातच लपलेला असतो. तो चहा नाष्टा करत असताना राणा तिथे पोहोचतो. राणाला पाहाताच तो सोफ्यामागे लपतो. त्यावर सुरेखा इशाऱ्याने तो सोफ्यामागे असल्याचे सांगते. त्यावर कॉलर धरून राणा त्याला तिथून बाहेर काढतो. आता पुढच्या भागात गावकरी पप्याला झाडाला बाधून शिक्षा देणार आहेत तर दुसरीकडे नंदिनीला प्रापर्टी नावावर करण्याची घाई लागणार आहे. आता या सगळ्यात पुढे काय होते हे पाहाणे रंजक असणार आहे.  

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी