Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्ष संसार केल्यानंतर हृतिक-सुझैन वेगळे का झाले? भाऊ जायेद खानने सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:04 IST

"एखाद्यी गोष्ट टिकणार नसेल तेव्हा...", हृतिक-सुझैनच्या घटस्फोटावर भाऊ जायेद खानची प्रतिक्रिया

Zayed Khan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुझैन खान हे एकेकाळी इंडस्ट्रीतील पावर कपल म्हणून ओळखलं जायचं. मात्र, त्यांचं तब्बल १४ वर्षांचं नातं एकाएकी तुटेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. हृतिक आणि सुझैनच्या घटस्फोटाची इंडस्ट्रीत प्रचंड चर्चा झाली. पण, घटस्फोटानंतरही ते आपल्या मुलांसाठी एकत्र येताना दिसतात. त्यांच्यामधील मैत्री अजूनही टिकून आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझैन खानचा भाऊ जायेद खानने त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.

अलिकडेच झुमला दिलेल्या मुलाखतीत  काही गोष्टी खूप प्रयत्न करूनही टिकत नाही,असं वक्तव्य जायेद खानने केलं. तो म्हणाला," हे घडायला नको होतं. पण, जर एखाद्यी गोष्ट टिकणार नसेल तर ती ओढूण-ताणून धरण्याचा प्रयत्न करणं फार चुकीचं आहे. कारण, याचा त्या दोघांनाही त्रास होतो. आणि हे सगळं का आणि कशासाठी? म्हणजे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा विचारही करायचा असतो. त्यांना लहानाचं मोठं होताना तुम्हाला बघायचं असतं. हृतिक-सुझैनच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. त्यांच्या मुख्य उद्देश दोन्ही मुलांकडे लक्ष क्रेंदित करणं हाच बनला. 

त्यानंतर मग पुढे जायेद खान म्हणाला,"जे व्हायचं ते झालं. आता तुम्ही स्वत: वर लक्ष केंद्रित करा. तुमचा आनंद कोणत्या गोष्टीत आहे ते शोधा, त्यावेळी असाच विचार आमच्या कुटुंबीयांनी केला. आम्ही समाजाच्या दबावाखाली जगणाऱ्या  कुटुंबांसारखे नाही.आम्ही काही गोष्टींबद्दल थोडे अधिक जागरूक आणि सुशिक्षित आहोत.मला माहीत आहे की बहुतेक लोकांना हे खूप विचित्र वाटतं. काही जण नाराज आहेत. पण, ठीक आहे. काही हरकत नाही."

हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानबद्दल जायेद खान काय म्हणाला?

या मुलाखतीत हृतिक-सबा तसेच सुझान आणि अर्सलानच्या नात्याबद्दल अभिनेता म्हणाला,"प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी जो आदर आणि जी काळजी आहे, ती या संकल्पनेपेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे. त्यांना उत्तम जोडीदार भेटले आहेत. मला सबा खूप आवडते आणि ती व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. आणि अर्सलान तर माझ्या छोट्या भावाप्रमाणेच आहे.” असं यावेळी जायेद खानने सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Hrithik-Sussanne Separated After 14 Years? Zayed Khan Breaks Silence

Web Summary : Zayed Khan reveals Hrithik and Sussanne's divorce aimed at prioritizing their children's well-being. He emphasizes focusing on individual happiness, dismissing societal pressures. He appreciates Hrithik's and Sussanne's new partners, Saba and Arslan.
टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खानबॉलिवूडसेलिब्रिटी