Join us

बायकोचा हट्ट पण चहलचा नकार! अखेर धनश्री आणि युजवेंद्रच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 08:55 IST

Yuzvendra Chahal Dhanashree Divorce Reason: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी या सेलिब्रिटी कपलचा संसार मोडला. आता त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं आहे.

Chahal Dhanashree Divorce Reason:युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. २० मार्चला धनश्री आणि चहलचा घटस्फोट कोर्टाने मान्य केला. लग्नानंतर चार वर्षांनी या सेलिब्रिटी कपलचा संसार मोडला. धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाची बातमी ऐकताच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं आहे. 

धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाला (Divorce Reason) मुंबई कारण ठरल्याचं म्हटलं जात आहे. वरिष्ठ पत्रकार विकी लालवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्रीने आणि चहल या दोघांच्याही पर्सनालिटी वेगळ्या असल्याने ते फार काळ एकत्र राहू शकणार नव्हते. त्यातच धनश्रीने चहलला हरियाणातून मुंबईला शिफ्ट होण्याचा हट्ट केला होता. चहलने मुंबईत यावं, असं धनश्रीला वाटत होतं. मात्र, आईवडिलांना सोडून येण्यासाठी चहल तयार नव्हता. 

"लग्नानंतर चहल आणि धनश्री युजवेंद्रच्या आईवडिलांसोबत हरियाणात राहत होते. फक्त कामानिमित्तच ते मुंबईला येत होते. पण, यावरुनच त्यांच्यात वाद होत होते. आईवडिलांना सोडून मुंबईला शिफ्ट होण्यासाठी तयार नसल्याचं चहलने धनश्रीला स्पष्ट सांगितलं होतं. हेदेखील त्यांच्या घटस्फोटाच्या काही महत्त्वाच्या कारणांपैकी एक होतं", असं विकी लालवानी यांनी म्हटलं आहे. 

युजवेंद्र चहल-RJ महावश रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या हार्दिक पांड्याच्या VIDEO मागचं सत्य.

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलने २०२० मध्ये लग्न केलं होतं. पण, घटस्फोटाआधी अनेक महिन्यांपासून ते वेगळे राहत होते, अशी माहिती त्यांनी न्यायालयात सांगितली. याच कारणामुळे चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेतील सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ पिरिडदेखील रद्द करत त्यांच्या घटस्फोटावर तातडीने सुनावणी करण्यात आली होती.  

टॅग्स :युजवेंद्र चहलऑफ द फिल्डघटस्फोटसेलिब्रिटीआयपीएल २०२४इंडियन प्रिमियर लीग २०२५