Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावर 'बॉलीवूड स्टाईल'मध्ये होणार, एक नंबर धमाल!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 10:10 IST

गायनाचा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अशीच आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे.

'युवा सिंगर एक नंबर' हा आगळावेगळा गाण्याचा उत्कृष्ट कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमाचे  श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतात. या मालिकेचे परीक्षक वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेतचं, मात्र ते पहिल्यांदाच एका गाण्याच्या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहेत. त्याच्या सोबतीने शास्त्रीय संगीत नसानसामध्ये  भरलेली उत्कृष्ट गायिका सावनी शेंडे आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका अभिनेत्री  मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवत आहेत.  

आपलं वेगेळेपण जपत पुढे जाणारी ही स्पर्धा आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली आहे. नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येण्याचा 'युवा सिंगर एक नंबर' प्रयत्न करत असते. गायनाचा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अशीच आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे. 'युवा सिंगर'च्या बॉलीवूड स्पेशल आठवड्यात, प्रेक्षकांना उत्तोमोत्तम हिंदी गाणी ऐकण्याची संधी या बुधवारी व गुरुवारी मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धक छानशा रेट्रो कपड्यांमध्ये मंचावर आलेले पाहायला मिळतील. बॉलीवूडची जुनी, गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील.

 

या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करतांना, स्पर्धकांचा कस लागणार आहे. हा खास भाग अनुभवण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा युवा सिंगरच्या मंचावर हजर असतील. परीक्षकांच्या बरोबरीने तेदेखील या विशेष आठवड्याचा आनंद घेताना दिसतील. 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे', 'ये मेरा दिल, प्यार का दिवाना', 'मेहबुबा, मेहबुबा' अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन गाणी ऐकणे म्हणजे रसिकांना एक छान मनोरंजनाची पर्वणीच मिळणार आहे. 

टॅग्स :युवा सिंगर एक नंबर