Join us

"तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल", श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:54 IST

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दोनदा लग्न केले. पण ते अपयशी ठरले. श्वेताने आपल्या मुलांना एकटीने वाढवले ​​आहे.

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दोनदा लग्न केले. पण ते अपयशी ठरले. श्वेताने आपल्या मुलांना एकटीने वाढवले ​​आहे. घटस्फोटामुळे श्वेताला खूप टोमणे ऐकावे लागले होते. श्वेताची चर्चा होईपर्यंत ती गप्प होती पण जेव्हा लोकांनी तिची मुलगी पलक हिला या सगळ्यात ओढायला सुरुवात केली तेव्हा ती गप्प बसली नाही आणि तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

श्वेता तिवारीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लोक तिची मुलगी पलकबद्दल खूप वाईट कमेंट करत आहेत. पलकला लग्नाबद्दल टोमणे मारले जात होते, त्यानंतर श्वेताने ट्रोल्सला फटकारले. श्वेताने बॉलिवूड बबल्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगबद्दल खुलेपणाने सांगितले होते. ती म्हणाली होती की, 'तुम्ही दोन लग्न केली आहेत, तुमची मुलगी पाच लग्न करेल, असे लोक टोमणे मारायचे. श्वेता पुढे म्हणाली की, 'मुलगी पलकने जे काही पाहिले आणि सहन केले त्यानंतर असे वाटते की ती कधीच लग्न करणार नाही.'

श्वेताचे दोन्ही लग्न ठरले अपयशी

श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्याच्यापासून एक मुलगी आहे, जिचे नाव पलक तिवारी आहे. श्वेताने राजा चौधरीवर मारहाणीचा आरोप केला आणि घटस्फोट घेतला. राजापासून घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले. श्वेता आणि अभिनवला एक मुलगा आहे, त्याचे नाव आहे रेयांश. श्वेताने आरोप केला होता की, अभिनव मुलगी पलकसोबत असभ्य बोलत होता.

वर्कफ्रंट

पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर पलकचा एकही चित्रपट आला नाही. बिजली म्युझिक व्हिडिओमुळे ती सर्वत्र चर्चेत आली होती.

टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारी