Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काची तलवारबाजी पाहून व्हाल थक्क, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 20:30 IST

अभिनेत्री अश्विनी महांगडेने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेच्या सेटवर तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर सध्या ती झी मराठी वाहिनी वरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणुबाईच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. भरजरी साडी, वजनदार दागिने, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणूबाईंची भूमिका सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. 

अभिनेत्री अश्विनी महांगडेने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेच्या सेटवर तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की,' शेवटच्या श्वासापर्यंत तलवार म्यान न होऊ देणे हेच खऱ्या योद्धाचे अमरत्व...!!!'

अभिनयाशिवाय सामाजिक भान जपत अश्विनीने 'स्वराज्य परिपूर्ण किचन' हे हॉटेल नुकतेच मिरा रोड येथे सुरु केले आहे.

स्वराज्य परिपूर्ण किचनमध्ये 'स्वराज्य थाळी' ही खास थाळी तुम्हाला मिळणार आहे. या थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी फक्त ४० रुपयांना आहे. संपूर्ण जेवण तेही फक्त ४० रुपयात ऐकून नवल वाटले असेल ना. पण स्वराज्य थाळीमध्ये दोन चपात्या, दोन प्रकारच्या भाज्या, वरण-भात, पापड, कोशिंबीर, एक गोड पदार्थ आणि ताक अशा स्वादिष्ट मेनूचा समावेश आहे.

याबाबत सांगताना अश्विनी म्हणाली की, ''स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका करत असताना माझ्या मनात शिवरायांच्या विचारांचे खोलवर परिणाम झाले आणि त्यामुळेच मी हा उपक्रम सुरू केला.' अश्विनीच्या या उपक्रमासाठी तिचे कौतूक करू तेवढे कमीच आहे.

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजी