Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:14 IST

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर सगळेच सेलिब्रेटी प्रचंड सक्रीय असतात.चाहत्यांसह संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया उत्तम माध्यम, कलाकारांनाही चाहत्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पटकन कळतात. सध्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि प्रिया बापट सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर यांची 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही वेबसिरीज खूप गाजली होती. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. सिद्धार्थ चांदेकरही या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे का ? चाहतेही असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. दुस-या भागात प्रिया आणि सिद्धार्थ शिवाय अभिनेते सचिन पिळगांवर, अतुल कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, अजाज खान अशी स्टारकास्ट आहे. नागेश कुकूनूर यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान याच वेब सिरीजचा एक फोटो सोशल मीडियावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट केला आहे. गंमतीत प्रिया बापटनेही 'सिध्या' म्हणून कमेंट केली आणि यावरच सिद्धार्थने एक मजेशीर कमेंट केली आहे. 'गप, तूच मारलं मला' असा रिप्लाय त्याने दिला आहे. सिद्धार्थच्या या रिप्लायवर चाहतेही भरुन कमेंट करत आहेत. सिद्धार्थच्या रिप्लायने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

तुर्तास वेबसीरीजच्या ट्रेलरलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे. दुसऱ्या सीझनमध्ये लेक आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. सत्तेच्या लालसेपुढे सर्व नाती छोटी असतात. एखादा राजकारणी याच लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी देखील त्याला कशी जोरदार टक्कर देते, हे या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे. या वेबसिरीजचा पहिला दमदार अभिनयाबरोबर तितकीच दमदार कथा असल्यामुळे सीरीज प्रचंड गाजली होती. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांनाही ही सिरीज पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता लागली आहे. 

टॅग्स :प्रिया बापटसिद्धार्थ चांदेकर