Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आली ठुमकत...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने डान्स करत लग्नात घेतली 'लय भारी' एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 17:40 IST

लग्नात अभिनेत्रीने डान्स करत घेतली एन्ट्री, व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क

गेल्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ बोडके-तितीक्षा तावडे, प्रथमेश परब, पूजा सावंत यांच्यानंतर टीव्हीवरील लोकप्रिय कपल असलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेही लग्नाच्या बेडीत अडकले. योगिता आणि सौरभने कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

लग्नात योगिताने अगदी दणक्यात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळतं. "आली ठुमकत नार लचकत" या गाण्यावर डान्स करत योगिताने एन्ट्री घेतली. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत योगिता ठुमके लगावताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. आयुष्यातील या खास क्षणासाठी योगिताने लाल रंगाची नऊवारी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर सौरभ धोतर आणि फेट्यामध्ये राजबिंडा दिसत होता. 

सौरभ आणि योगिता यांनी कलर्स वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत ते पती-पत्नीच्या भूमिकेत होते. प्रेक्षकांच्या या लाडक्या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने चाहते आनंदी आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग