Join us

'ये रिश्ता क्या कहलाता है'फेम शिरीन सेवानी अडकली लग्न बंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो

By गीतांजली | Updated: December 7, 2020 13:30 IST

लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

सध्या लग्नचा सीझन सुरू झाला आहे आणि आता सेलिब्रेटीही यात काही मागे नाहीत. सना खान, नेहा कक्कर आणि आदित्य नारायणानंतर आता टीव्ही सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' अभिनेत्री शिरीन सेवानीने तिचा बॉयफ्रेंड उदयन सचानशी लग्न केले आहे. शिरीन आणि उदयनने कोरोनामुळे कोर्ट मॅरेज केले. उदयन हे एअरलाइन्समध्ये कॅप्टन आहे.

शिरीन 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत जसमीत माहेश्वरीची भूमिका साकारत आहे. रविवारी शिरीन आणि उदयन यांचे दिल्लीमध्ये कोर्ट मॅरेज झाले असून त्यानंतर या कपलचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शिरीन म्हणाली, 'आम्ही दोघे एका कॉमन फ्रेंडच्या बर्थडे भेटलो  होतो, ज्या पार्टीमध्ये आम्ही दोघेही जाणार नव्हतो. पण नशिबात काहीतरी वेगळे होते. जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो तेव्हा एकमेकांसाठी काही तरी वेगळीच फिलिंग आली, आणि आज आम्ही एकत्र आहोत. '' शिरीनने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सेलिब्रिटींच्या लग्नचा सीझन अद्याप थांबलेली नाही. 'बिग बॉस 7' ची विजेता गौहर खान 25 डिसेंबरला  बॉयफ्रेंड जैद दरबारशी लग्न करणार आहे.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है