Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये काली काली आँखे 2'साठी १० किलो वजन कसं कमी केलं? गुरमीत चौधरी म्हणाला- "मी दररोज सकाळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:07 IST

'ये काली काली आँखे 2' साठी गुरमीत चौधरीने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलंय. त्यामागचं रहस्य अभिनेत्याने सांगितलंय

'ये काली काली आँखे 2' या वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. पहिल्या सीजनच्या घवघवीत यशानंतर 'ये काली काली आँखे 2'ला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 'ये काली काली आँखे 2'मध्ये जुन्या स्टारकास्टसोबत अभिनेता गुरमीत चौधरी सहभागी झालाय. गुरमीतला आपण अनेक हिंदी मालिकांमध्ये याआधी पाहिलंय. गुरमीतने 'ये काली काली आँखे 2'साठी स्वतःचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करत १० किलो वजन घटवलं आहे. यासाठी गुरमीतने किती मेहनत केली याचा खुलासा त्याने केलाय.

गुरमीतने असं घटवलं १० किलो वजन

'ये काली काली आँखे 2'मध्ये गुरमीतने गुरुची भूमिका साकारलीय. या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी करावी लागणारेय, याचा दृष्टीकोन दिग्दर्शक सिद्धार्थ सेनगुप्तांनी गुरमीतला सांगितला होता. गुरमीत म्हणाला, "मी या भूमिकेच्या तयारीसाठी अनेक अभिनय वर्कशॉपमध्ये भाग घेतला. यासाठी मी माझ्या लांब केसांना कात्री लावली. याशिवाय वजन कमी करण्यासाठी कडक डाएट प्लॅन फॉलो केला. मला हवा तसा लूक मिळवण्यासाठी मी रोज वांद्रे येथे धावायला जात असे. अशाप्रकारे १० किलो वजन कमी केलं."

'ये काली काली आँखे 2' सीरिजविषयी

'ये काली काली आँखे २' या वेबसीरिजमध्ये अभिनेतागुरमीत चौधरीची भूमिका सर्वांना सरप्राइज करुन जाणारी आहे. गुरमीत पूर्वीचा मित्र म्हणून पाहायला मिळतोय. वेबसीरिजमध्ये पुन्हा एकदा ताहिर राज भासीन, आँचर सिंग, श्वेता त्रिपाठी, ब्रिजेंद्र काला, सौरभ शुक्ला, अरुणोदय सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. २२ नोव्हेंबरपासून ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

टॅग्स :गुरमीत चौधरीनेटफ्लिक्सवेबसीरिज