Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये दिली होती MBAची इंट्रास एक्झाम, शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 17:42 IST

'ये है मोहब्बते' मालिकेतून ही अभिनेत्री घराघरात पोहचली होती आणि तिने लग्नानंतर तिने ही मालिका सोडली होती.

'ये है मोहब्बते' फेम मिहिका वर्माने लग्नानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती तिचा नवरा आनंद कापाईसोबत युएसमध्ये स्थायिक झाली आहे. दोघांनी २७ एप्रिल, २०१६मध्ये लग्न केले आणि २०१८मध्ये ते दोघे पालक झाले. मिहिकाला एक मुलगा असून त्याचे नाव इजहान आहे. 

आता मिहिकाने जुना फोटो शेअर करीत प्रेग्नेंसी दरम्यानच्या कित्येक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने अनुभव शेअर करताना सांगितले की, ही मी आहे जेव्हा आम्हाला पहिल्यांदा समजले की मी प्रेग्नेंट आहे. मला माहित होते की माझे बाळ पोटात वाढत आहे. माझ्यासाठी हिरो किंवा प्रेरणेपेक्षा कमी नव्हते. डॉक्टरकडून परत आल्यावर मी आनंदला सांगितले की, 'मॉर्निंग सिकनेसमध्ये अभ्यास करणे माझ्यासाठी कठीण आहे. माझ्या प्रेग्नेंसीच्या पाचव्या महिन्यांपर्यंत मी दिवसभरात दहा वेळा उलट्या करायचे आणि त्याच वेळी मी इंट्रास परिक्षेसाठी अभ्यास करत होते. माझ्यासाठी शैक्षणिक जीवनात परत येण्याचा निर्णय सोप्पा नव्हता. लग्नानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मी गोंधळलेली होती. मला आठवतंय की एक दिवस मी इतकी रडली की आनंद घरी परत आला कारण मी एकटी असल्याचे वाटू नये. त्यांनी मला खूप समजावले.'

तिने पुढे म्हटले की, 'खूप विचारानंतर मी वेगवेगळ्या शाळेत आणि कोर्सेसची माहिती काढू लागले आणि मला काय आवडते हे पाहू लागले. जवळपास वीस शाळांमध्ये गेल्यानंतर मी आणखीनच गोंधळून गेले.

त्यावेळी माझ्या काकीने सल्ला दिला आणि मी आनंदला सांगितले की मला एमबीए करायचे आहे. मी इंट्रास एक्झाम दिली. ज्या दिवशी मला समजले की माझे बाळ जन्माला येते आहे. माझ्यासाठी हा टर्निंग पॉइंट होता. माझ्या बाळाने सर्वकाही बदलले.'

मिहिका वर्माने 'ये है मोहब्बते' मालिकेत दिव्यांका त्रिपाठीच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती. लग्नानंतर तिने हा शो सोडला आणि तिच्या जागी अवंतिका हुंडलची वर्णी लागली.

टॅग्स :ये है मोहब्बतेंदिव्यांका त्रिपाठी