Join us

फॅट टू फीट! 'ये हैं मोहब्बतें' फेम अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वाढलेल्या वजनामुळे झाली होत ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:53 IST

Anita hassanandani: मुलाच्या जन्मानंतर अनिताचं वजन प्रचंड वाढलं होतं. ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी (Anita Hassanandani). 'ये हैं महोब्बते' या गाजलेल्या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारुन तिने अमाप लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनिता तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत येत आहे. अनिताने काही महिन्यांपूर्वीच एका गोड बाळाला जन्म दिला. मात्र, मुलाच्या जन्मानंतर तिच्या शरीरात अनेक बदल झाले . ज्यामुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोलं केलं. मात्र, आता अनिताने तिचं वजन कमालीची घटवलं असून तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

प्रेग्नंसीनंतर अनिताचं वजन कमालीचं वाढलं होतं.परंतु, अथक मेहनत आणि परिश्रम करत तिने तिचं वजन घटवलं. याविषयी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या या प्रवासाविषयी सांगितलं. सोबतच लोकांनी तिला कसं ट्रोल केलं हे सुद्धा सांगितलं.

"माझं लक्ष्य आता फार दूर राहिलेलं नाही. सकारात्मक राहिलो की सगळं चांगलंच घडतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येतो. पण, हार न माननं गरजेचं आहे", असं कॅप्शन देत तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. यापूर्वीही तिने एका पोस्टच्या माध्यमातून तिच्या या प्रवासाविषय़ी भाष्य केलं होतं.

दरम्यान, अनिता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने  अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.यात काव्यांजली, ये हैं महोब्बते, नागीन, 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी', 'झलक दिखला जा' ,'नच बलिए' यांसारख्या मालिका, शोमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :अनिता हसनंदानीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार