कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पीएम केअर फंडला मदत केली. आता यशराज फिल्मसने देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोजंदारी कामगारांना संरक्षणासाठी पुढे आली आहे. सेटिंग्ज विभाग, कार्पेंटर्स, लायटिंग, ज्युनियर आर्टिस्ट, स्पॉट्स आदींचा अशा कामगारांचा समावेश आहे. या कठीण काळात या कामगारांना उदरनिर्वाहासाठीची मूलभूत सामग्री पुरवली जावी आणि त्यांच्या कुटुंबांचीही काळजी घेतली जावी, यासाठी यशराज फिल्म्स प्रयत्नशील आहे.
चित्रपटउद्योगातील जास्तीत जास्त गरजू कामगारांना या कठीण आर्थिक परिस्थितीत आर्थिक साह्याचे संरक्षण पुरवण्यास वायआरएफ कटिबद्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मदतीच्या पहिल्या टप्प्यात वायआरएफ या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना 1.5 कोटी रुपयांचे वाटप करणार आहे.