Toxic Movie Release: दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता यश (Yash) प्रचंड मेहनतीनंतर जोरावर देशातील आघाडीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये एक आहे. यश नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सिनेसृष्टीत 'रॉकी भाई', 'रॉकिंग स्टार' या नावाने यश ओळखला जातो. सुपरस्टार यशचा आगामी सिनेमा 'टॉक्सिक' सध्या चर्चेत आहे. अलिकडेच 'टॉक्सिक' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला होता. आता चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
रॉकी भाई यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर 'टॉक्सिक' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'यशचा पुढचा चित्रपट 'टॉक्सिक' १९ मार्च २०२६ च्या आठवड्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी चित्रित केला जात आहे. यासह तो हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळमसह इतर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील डब केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहन दास यांनी केले आहे आणि निर्माते वेंकटकनारायण आणि यश आहेत.
यशच्या चित्रपटात एक दोन नाही तर चार अभिनेत्री आहेत. 'बॉलिवूड हंगामा'नुसार यामध्ये नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया, आणि कियारा आडवाणी, अच्युत कुमार आणि अक्षय ओबेरॉय हे देखील दिसतील. 'टॉक्सिक'साठी कियाराने तब्बल १५ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कियारा सहभागी झाली आहे. दरम्यान, यंदाच्या मार्च महिन्यात सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.