Join us

लाल बनारसी साडी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र, यामी गौतमीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 18:04 IST

यामीच्या लग्नातील फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.लग्नानंतल्या फोटोनंतर यामीने तिचा आणखीन एक फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री यामी गौतमउरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर सोबत गुपचूप लग्न करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ४ जूनला या कपलने लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात केली.  लग्नात अतिशय मोजके आणि जवळचे पाहुणे उपस्थित होते.  कोरोना परिस्थितीमुळे हिमाचल प्रदेशात यामी आणि आदित्यचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. त्यानंतर या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

लग्नाआधी पार पडलेल्या मेहंदी, हळदीचे फोटोदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यांमध्ये लाल साडी सोबत पहाडी नथ परिधान केलेल्या फोटोंने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले होते. लग्नझाल्यापासून यामी सोशल मीडिया चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत आहे.

यामीच्या लग्नातील  फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.लग्नानंतल्या  फोटोनंतर यामीने तिचा आणखीन एक फोटो शेअर केला आहे. लग्नानंतरचा तिचा हा पहिला फोटो आहे. कपाळावर लाल टिकली,  दागिने, केसात माळलेला गजरा आणि गळ्याक मंगळसूत्र यांत यामीचे सौंदर्य खुलून गेले आहे.नववधू अंदाजात यामीच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते.यामी अतिशय देखणी आहे, पण जेव्हा तिने भांगात कुंकू भरले, तेव्हा तिचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे पाहायला मिळाले.  या फोटोंमध्ये नववधू यामीचा  अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आदित्यने दिग्दर्शित केलेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात यामीने काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम फुलत गेले. परंतु या दोघांनीही आपल्या रिलेशनबद्दल कुठेही कोणतीच माहिती दिली नव्हती. आपल्या नात्याबद्दल दोघांनीही मौनच राखणे पसंते केले होते. 

 

टॅग्स :यामी गौतमउरी