Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध तीन भाऊ असणार कपिल शर्मा शोचे पहिले गेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 14:41 IST

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ त्यांच्या झिरो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती.

ठळक मुद्देसलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान पहिल्या भागात उपस्थिती लावणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फॅन्सना डिसेंबरमध्ये दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. एकतर तो गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार तर दुसरी लवकरच तो कॉमेडी शोमधून पुनरागमन करायला तयार आहे. कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार तसेच कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात कोण सेलिब्रेटी असणार याविषयी एका वर्तमानपत्राने नुकतीच बातमी दिली आहे. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ त्यांच्या झिरो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. पण आता हे तिघे नव्हे तर सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान पहिल्या भागात उपस्थिती लावणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. खान कुटुंबियातील हे तिन्ही भाऊ प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. हे तिघे कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील एकत्र झळकले होते. ते एकत्र आले की, मजा-मस्ती करणार यात काहीच शंका नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार असे म्हटले जात आहे.

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये कपिल शर्मासोबत भारती सिंग, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा आणि सुमोना चक्रवतीसुद्धा दिसणार आहेत. हा शो २३ डिसेंबरला सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशीच कपिल शर्मा आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणार आहे.  

या कार्यक्रमाच्या नव्या सिझनचा फॉर्मेट देखील कपिल शर्माच्या जुन्या कॉमेडी शो सारखाच असणार आहे. 

 

टॅग्स :कपिल शर्मा सलमान खानअरबाज खानसोहेल खान