Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्ण पेठेचा हा फोटो का होतोय व्हायरल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:13 IST

तसेच पर्ण पेठे लवकरच शुद्ध देसी मराठीच्या फोमो (Fomo) या वेब सिरीजमध्येही झळकणार आहे.

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो पर्ण पेठे सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. नुकतंच पर्णने एक फोटोशूट केले आहे. हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे. यामध्ये पर्ण पेठेचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे.  पर्ण पेठेने मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहेत. 'विहीर', 'रमा माधव', 'वायझेड', 'फोटोकॉपी' अशा विविध सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच पर्ण पेठे लवकरच शुद्ध देसी मराठीच्या फोमो (Fomo)  या वेब सिरीजमध्येही झळकणार आहे.  

शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री पर्ण पेठे हिलाही आहे. पर्ण ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पेंटिंग पोस्ट केले होतं. या चित्राला तिने ‘आमचं घर’ असं कॅप्शन दिले होते. तिनं काढलेले हे चित्र पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. 

टॅग्स :पर्ण पेठे