Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला गुल पनागने का घातले 14 वर्षे जुने कपडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 11:17 IST

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिने नुकतेच मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते.

ठळक मुद्दे2011 मध्ये गुलने प्रियकर ऋषि अटारीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतेच तिने नुकतेच मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसली होती. 1999 मध्ये गुलने हा स्विमसूट घातला होता. 2019 मध्ये तिने हाच स्विमसूट पुन्हा वापरला. याचा अर्थ गुल पनाग एक ड्रेस अनेकदा वापरू शकते. अन्य बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे एक ड्रेस दुस-यांदा रिपीट होता काम नये, असे तिचे अजिबात नाही. आता दिवाळीचेच बघा ना. या दिवाळीला गुलने 14 वर्षे जुना सूट घातला.

गुल पनागने स्वत: या ड्रेसमधील फोटो शेअर करत याची माहिती दिली. या दिवाळीला आणि येत्या वर्षासाठी माझी संकल्प आहे. तो म्हणजे, ‘Reuse and Recycle’. हा एक स्थायी पर्याय आहे आणि कमी खर्चिक आहे, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले.

गुलने 1999मध्ये मिस इंडीया यूनिवर्सचा पुरस्कार जिंकला होता. त्याचबरोबर तिला ब्यूटीफुल स्माइलचा पुरस्कारही मिळाला आहे. गुलने बॉलिवूडमध्ये फिल्मी करियरची सुरूवात ‘धूप’ या सिनेमातून केली आहे. हा सिनेमा 2003मध्ये रिलीज झाला होता.

त्यानंतर तिने  जूर्म, डोर, मनोरमा सिक्स फिट अंडर,  हॅलो, स्ट्रेट , रण अशा अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला. सिनेमांशिवाय गुलने टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. कश्मीर, खूबसूरत, किसमे कितना है दम, मुसाफिर हू यारो आणि  विजय ज्योत अशा अनेक मालिकांमध्ये दिसली होती.

मॅक्सिको मासिकाच्या मुखपृष्ठासाठी तिने 2008मध्ये फोटोशूट केले होते. त्यामध्ये ती हॉट अंदाजामध्ये दिसली होती. 2011 मध्ये गुलने प्रियकर ऋषि अटारीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.

टॅग्स :गुल पनाग