प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत फेव्हरेट कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे नेहमी चर्चेत येत असतात. ही जोडी मागील दोन वर्षांपासून एकत्र आहेत आणि आपल्या विवाहित जीवनात खूश आहेत. प्रियंका चोप्राचे लग्न निक जोनससोबत राजस्थानमधील जोधपूरमध्ये २०१८ साली झाले होते. निक आणि प्रियंकाची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
निक जोनस आणि प्रियंका चोप्राने दोन महिने एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर दोघांनी जुलै २०१८ला साखरपुडा केला. साखरपुड्याच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला प्रियंका आणि निकने मॅचिंग टॅटू बनविला होता. हा टॅटू प्रियंकाच्या दोन्ही कानाच्या मागे टॅटू आहे. एका कानाच्या मागे बॉक्स बनावला आहे तर दुसऱ्या कानाच्या मागे टिकचे निशाणा बनवला आहे. हे सेम टॅटू निकने आपल्या दोन्ही हातांवर काढले आहे. आता प्रियंकाने यामागचे कारण सांगितले आहे.