Join us

"'खुपते तिथे गुप्ते' का बंद करताय?", चाहत्याच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला अवधुत गुप्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:26 IST

अवधूत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर चांगलाच गाजला. एकूण १६ भाग प्रदर्शित झाल्यावर १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

अवधूत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर चांगलाच गाजला. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार, राजकारणींनी हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनेक एपिसोड गाजले. एकूण १६ भाग प्रदर्शित झाल्यावर १७ सप्टेंबरला या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षक हा शो इतक्या लवकर का बंद केला, असा सवाल करत आहेत. दरम्यान आता एका चाहत्याने थेट अवधून गुप्तेला हा शो इतका लवकर का बंद केला, असा प्रश्न केला आहे.

एका नेटकऱ्याने अवधूत गुप्ते प्रश्न विचारला की, शेवटचा भाग? खूप छान शो होता… आम्ही नेदरलॅंडमधून पाहतो आणि आम्हाला हा कार्यक्रम आवडतोही…का बंद करताय? लय भारी होता अवधुतदा…” . यावर उत्तर देताना अवधुत म्हणाला की, पुढचा सीझन लवकरच करणार की वो दादा!! अवधूतच्या या ट्वीटवरून या कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच येणार असल्याची चर्चा आहे.

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा पहिला सीझन २५ जून २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर दुसरं पर्व २०१३ मध्ये प्रदर्शित झाला. दुसऱ्या सीझननंतर तब्बल १० वर्षांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा तिसरा सीझन ४ जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता प्रेक्षक या कार्यक्रमाच्या चौथ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :अवधुत गुप्ते