Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याबद्दल रसिकांच्या मनात निर्माण होणारा राग हीच माझ्या कामाची पावती- अभिजीत खांडकेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 06:30 IST

अभिजीत पहिल्यांदाच या मालिकेतून खलनायकी छटा असलेली भूमिका रंगवतो आहे आणि त्याला रसिकांकडून उत्तम दादही मिळते आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी अभिजीतने मोठ्या खुबीने रंगवला आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांना चांगलीच भावली आता ही मालिका निर्णायक वळणावर आली आहे.  मुळात चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिजीत पहिल्यांदाच या मालिकेतून खलनायकी छटा असलेली भूमिका रंगवतो आहे आणि त्याला रसिकांकडून उत्तम दादही मिळते आहे.

गुरुनाथ या भूमिकेबद्दल बोलताना अभिजित म्हणाला, “बास्टर्ड बट लव्हेबल अशा शब्दांत गुरुनाथ या व्यक्तिरेखेचे वर्णन लेखक-दिग्दर्शकानं केलं होतं. नकारात्मक अशी भूमिका करू नको, त्यामुळे तुझ्या इतर कामांवरही परिणाम होईल, असा सल्ला अनेकांनी दिला होता. परंतु ही भूमिका मी आव्हान म्हणून स्वीकारली आणि पुढे काय घडलं हे सर्वश्रुत आहेच. हा निर्णय घेतल्याचा मला मनस्वी आनंद आहे. लोक प्रेमानं येऊन भेटतात. काहीजण माझ्या कामाचं कौतुक करतात तर काहीजण खूप राग राग करतात आणि असं वागू नका हो तुम्ही असं ठणकावून सांगतात. एखाद्या खलनायकी वृत्तीच्या पात्राला असं  प्रेम मिळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. रसिकांचा हा राग माझ्या कामाची पावती आहे असं मी मानतो.”

 छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा' 'भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत.अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा हीदेखील अभिनेत्री असून ती खुप सुंदर दिसते.सुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती वेस्टर्न व ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा खांडकेकरदेखील अभिनेत्री आहे. तसेच ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे.

टॅग्स :अभिजीत खांडकेकरमाझ्या नवऱ्याची बायको