स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर नवीन वर्षात नवीन मालिका भेटायला येणार आहेत. पिंकीचा विजय असो (Pinkicha Vijay Aso) या नव्या मालिकेसोबतच आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होत आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता ‘मुरांबा’ (Muramba) ही मालिका प्रसारित होत आहे. शशांक केतकर (Shashank Ketkar)सोबत या मालिकेत दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
मुरांबा या नव्या मालिकेत शशांक केतकर सोबत अभिनेत्री शिवानी मुंढेकर झळकणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला. या व्हिडीओत पाहायला मिळालं की शशांकचा एका मुलीला धक्का लागतो आणि ती मुलगी त्याच्या प्रेमात पडते. शशांक तिला खूप काही बोलतो. तितक्यात तिची बेस्ट फ्रेंड येते आणि ती शशांकला जाब विचारते. शशांक त्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्यामुळे प्रेमाचा हा आंबट गोड मुरंबा कसा मुरणार?…हे प्रेक्षकांना मालिकेतून पाहायला मिळणार आहे. नायकाच्या प्रेमात पडलेल्या नायिकेची भूमिका शिवानी मुंढेकर साकारते आहे.